सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.
चांगले पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे ही प्राजक्ता शहापुरकर यांची लहानपणी पासूनची पॅशन आहे. घर संसार चालवित असताना मुले मोठी झाल्यावर त्यांनी पैसे गुंतवून आपल्या पॅशन चे व्यवसायात रूपांतरण करून घेतले आहे.
स्वतःच्या पाककृतींवर संशोधन करून त्यांनी नवीन खाद्यपदार्थ शोधून काढले. आणि जीएसबी खाद्य संस्कृती हे पुस्तक लिहिले आहे. यातूनच महाराष्ट्र किचन क्वीन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी क्वीन होण्याचा मानही मिळवला आणि त्यांच्या पाककृती घरोघरी पोहोचल्या.आपले रोल मॉडेल आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सोबतीने त्यांनी मास्टर रेसिपीज हे एक यु ट्यूब चॅनेलही काढले.
त्या स्वतःचे हॉटेल चालवतात अनेक स्पर्धात त्यांना जुरी म्हणून बोलावले जाते आणि जळगाव येथे झालेल्या 2500 किलो अंड्यांच्या पाककृतीच्या विक्रमात त्यांचा सहभाग आहे.
Nice information.