Wednesday, November 20, 2024

/

‘वडीलांसमोरच मुलाचा मृत्यू’

 belgaum

झाडशहापूर नजीक दुचाकीवरून पडलेल्या युवकाला कारने उडवले आहे .नेहमी प्रमाणे खानापूरहून उद्यमबाग बेळगाव येथील कारखान्यात कामाला निघालेल्या बापलेकाच्या दुचाकीचा अपघात होऊन तरुण जागीच ठार झाला. शुभम पुंडलिक गुंजीकर वय 24 रा. रविवार पेठ खानापूर असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात घडला.
खानापूरहून निघालेल्या गुंजीकर पिता पुत्रांची दुचाकी झाडशहापूरजवळ आल्यावर पाठीमागून येणार्‍या एका टँकरची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेने दोघेही खाली कोसळले. शुभम हा रस्त्यावर पडला. तो उठून बाजुला येत असताना नेमकी याच वेळी बेळगावहून खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने शुभमला उडवले.

या धडकेत शुभमच्या डोक्याला जबर मार लागला. वडील पुंडलिक यांनी त्याला मांडीवर घेऊन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नाका तोंडातून रक्तस्त्राव होऊन काही क्षणातच शुभमचा मृत्यू झाला. या घटनेने खानापूर शहरात शोककळा पसरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लक्ष्मी यात्रेत शुभमने सार्वजनिक कामात हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम सेवा दिली होती. लाघवी व मनमिळाऊ स्वभावामुळे मित्रांचाही तो आवडता होता.

 

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.