बेळगाव शहराच्या वेगवेगळ्या भागात चोऱ्यांचे व घरफोड्यांची संख्या वाढत आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी घरे पडून चोर चोरी करू लागले आहेत. आता बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे तपास विभागाने गस्त वाढविण्याची गरज आहे. कणबर्गी आणि परिसरात चोर्या व घरफोड्यांचे संख्या जास्त झाली आहे. ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे हे घर बंद होते त्या घराच्या पाठीमागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी दोन लाखाचा माल प्रसार केला. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र त्यांना यश आले नाही.
कणबर्गी येथील सुरेखा बालाजी दड्डीकर या महिलेच्या घरी सोमवारी ही चोरी घडली आहे. त्यांचा मुलगा कॉलेजला गेला होता आणि त्या घराला कुलूप लावून शिवण क्लास ला गेल्या होत्या.
दुपारी जेवण करायला गेल्यावर दुपारी दीड वाजता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आहे .बेळगाव पोलीस आयुक्तालयात उपायुक्त यशोदा वंटगुडी यांच्याकडे गुन्हे तपास विभाग सोपवण्यात आला आहे .त्यांनी आता हाता खालील पोलिसांना कामाला लावून बेळगाव शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्ती वाढवण्याची गरज आहे.
रात्रीच्या वेळी पोलिसांचे काम अतिशय प्रभावीपणे सुरु असते मात्र दिवसाही गस्ती घालून बंद घरे आणि इतरही ठिकाणी चोर्या होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. चोरट्यांचा टोळक्याचा तपास लावून लवकरात लवकर त्यांना गजाआड केल्याशिवाय चोऱ्या आणि घरफोड्या थांबणार नाहीत. याची नोंद बेळगावच्या पोलीस दलाने घेण्याची गरज आहे.