तीन वेळा सतत जिंकलेल्या भाजपला बेळगावातून पराभूत करण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा लिंगायत कार्ड खेळण्याचे संकेत दिले आहेत.काँग्रेस हाय कमांडने व्ही एस साधूंनावर किंवा शिवकांत सिदनाळ यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना हे संकेत दिले आहेत. हाय कमांड ने सिदनाळ आणि साधूनावर या दोघांपैकी एकट्याला उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे कुणालाही तिकीट दिल्यास जिल्ह्यातील काँग्रेस नेते काम करतील असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.बेळगाव जिल्ह्यात लिंगायत मतदारांची संख्या अधिक आहे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने लिंगायत चेहऱ्याना पसंती दिली आहे.
राहुल गांधी यांच्या बेळगाव आणि चिकोडीत दोन जाहीर सभा होतील चिकोडीतुन पुन्हा एकदा प्रकाश हुक्केरी मैदानात असतील ते नाराज नाहीत आणि भाजपात जाण्याचा प्रश्नच येत नाही असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
बेळगाव लोकसभे साठी अंजलीताई निंबाळकर अशोक पट्टण यांनी तिकीट रेस मधून माघार घेतली तर विवेकराव पाटील यांनी अर्जच केला नव्हता असेही जारकीहोळी म्हणाले.राहुल गांधी यांना कर्नाटकात निवडणूक लढण्याचे आमंत्रण सिद्धरामय्या यांनी दिले असून याबाबत अजून काहीही ठरलेलं नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
कोण आहेत हे सिदनाळ साधूंनावर?
शिवकांत सिदनाळ हे तीन वेळा बेळगावचे खासदार पद भूषवलेल्या माजी खासदार एस बी सिदनाळ यांचे पुत्र व भाजप नेते व्ही आर एल मालक विजय संकेश्वरी यांचे जावई आहेत आदित्य मिल्क या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जन संपर्क वाढवला आहे.
के एल इ चे या लिंगायत समाजातील मोठया शिक्षण संस्थेचे संचालक असून राणी चन्नम्म सहकारी पथ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले आहे.मागील लोकसभेत देखील ते इच्छुक होते मात्र त्यांनी संधी मिळाली नव्हती.