ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याच्या टाकीची नासधूस करण्याचा प्रकार भांदुर गल्ली व ताशीलदार गल्लीतील बोळात घडला आहे.आज जिथे पाण्याचा प्रत्येक थेब थेंब साठवून जलक्रांती करण्याची गरज आहे तिथे हा किळसवाना प्रकार घडला आहे.
जिथे पाण्याची टाकी होती तिथे बाजूलाच मूक जनावरांना सुद्दा पाण्याची व्यवस्था म्हणून एक टाकी बांधली होती ती टाकी सुद्धा फोडण्याचा प्रकार घडला आहे.पाणी नसेल तर मनुष्य विकत घेऊन पिऊ शकतो पण मूक जनावर ऐन उन्हाळ्यात कुठे जाणार ? टाकी मोडणाऱ्या लोकांनी किमान मूक जनावरांचा तरी विचार करायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया लोकांमधुन उमटत आहेत.
पाण्याची टाकी, होळीच्या आगीत होळी आणि रंगपंचमीच्या सणाला गालबोट लावण्याचे प्रकार अनेक वेळा घडताना दिसतात त्यात हा समाजकंटकांनी मोडून काढले. पाण्याची टाकी होळीच्या आगीत जाळण्याचा प्रकार प्रकार देखील होळीच्या निमित्ताने बेळगावात घडलेला आहे.
सदर पाण्याच्या टाकी मुळे त्या परिसरात नागरिकांना चांगला उपयोग होत असे,मात्र नागरिकांना उपयोगाची ठरलेली पाण्याची टाकी जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.