देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं कर्करोग झाल्याने दीर्घकालीन आजाराने रविवारी सायंकाळी निधन झालं आहे.पर्रीकर आणि बेळगाव शहराचे अगदी भावनिक नाते होते त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते आणि कृतीतून देखील करून दाखवलं होत.
ज्यावेळी आठ वर्षा पूर्वी गोवा सरकारने गोव्या बाहेरून गोव्यात ये जा करणाऱ्या सर्व वाहनांना कर लावला होता त्यावेळी त्यांनी केवळ बेळगाव साठी हा कर माफ केला होता त्यावरून बेळगाव बाबत जवळीक दिसली होती.चेंबर ऑफ कॉमर्सचे तत्कालीन अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी त्यांची तात्काळ भेट घेऊन बेळगावातील व्यापारी वाहन कोणताच कर न देता दररोज जायची आणि यायची हे केवळ पर्रीकर यांच्या मुळे शक्य झालं होत. कोल्हापूर किंवा इतर कोणत्याच शहराला ती सवलत पर्रीकर यांनी दिली नाही जी बेळगावला दिली होती.
मुख्यमंत्री असतेवेळी अनेकदा तर केंद्रीय संरक्षण मंत्री असतेवेळी त्यांनी बेळगावला एकदा भेट दिली होतीज्या वेळी बेळगावची शिष्टमंडळ गोव्याला जायची प्रत्येक वेळी ते अनेकांना बेळगाव बाबत आवर्जून सांगायचे.
ज्यावेळी त्यांची गोव्यात एक लहान फॅक्टरी होती त्यावेळी ते प्रत्येक आठवड्यात फोर्ट रोडला येऊन कामे करून घेऊन जात असत.फोर्ट रोड मधल्या अनेक मेस्त्री लोकांची आणि हमालांची नाव देखील त्यांना पाठांतर होती फॅक्टरीतील अनेक सामान बस मधून पाठवून द्यायचे त्यामुळे बेळगावातील अनेक जणांचे ते ओळखीचे होते . स्वतःची स्कुटर यामा दुचाकी घेऊन ते गोव्याहून बेळगावला यायचे.. अश्या आठवणी देखील त्यांच्या निधनामुळे जाग्या झाल्या आहेत.