आगामी लोकसभा निवडणूक कायदा आणि सुव्यवस्थे बरोबरच भय मुक्त वातावरणात कशी पार पडेल त्याला आपण अधिक प्राधान्य देणार आहोत अशी माहिती नूतन पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी बेळगाव Live शी बोलताना दिली.
मंगळवारी सकाळी आमच्या वरिष्ठ पत्रकारांनी त्यांची विशेष भेट घेतली त्यावेळी मुलाखातीत त्यांनी ही माहिती दिली.मागील आठवड्यात लोकेशकुमार यांनी आपल्या अधिकार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे त्यानंतर बेळगाव Live ला पहिलीच मुलाखात दिली आहे.
लोकेश कुमार हे मूळचे हासन जिल्ह्यातील बेरूर गावचे असून 2005 सालचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांचे शिक्षण बी इ सिव्हील पर्यंत झाले असून त्यानंतर त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कारकीर्दीतील बराच मोठा काळ दक्षिण कर्नाटकाच्या सेवेत घालवला आहे प्रथमच त्यांची उत्तर कर्नाटकातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बेळगाव या प्रमुख शहरात बदली झाली आहे. मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात.अलीकडेच त्यांना उत्कृष्ट सेवे बद्दल मुख्यमंत्री पदक देखील मिळालेलं आहे.
शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण आणि गुन्हेगारी वाढलेली आहे प्रारंभीच्या काळात पोलीस बिट व्यवस्थेमूळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असा दावा पोलीस खात्या मार्फत करण्यात आला होता मात्र तो फोल ठरला आहे तसेच बिट व्यवस्था ही एक आदर्श असल्याचे म्हटले जात होते मात्र सध्या त्याची अंमलबजावणी योग्य रित्या होत नाही का याचा तपास करून योग्य कारवाई केली जाईल शहरातील गुन्हेगारी कमी करण्यावर भर राहील असे ते म्हणाले.चोरट्यांनी समाजातील डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर यांना टार्गेट केलेलं आहे ही चिंतेची बाब आहे.
महिला पोलीस स्थानकाचे काम समाधानकारक नसल्याने आरोप होताना दिसत आहे विशेष म्हणजे बहुतांश।लोकांना महिला पोलीस स्थानक कुठं आहे हेच माहीत नाही.पूर्वी हे स्थानक शहराच्या मध्यभागी होत सध्या ते शहरा बाहेर कैटोंमट हद्दीत हलवण्यात आले आहे त्यामुळे तक्रारदार महिलांची गैरसोय होत आहे.महिला पोलीस स्थानकाला केवळ रंग सफेदी करून त्याच सादरीकरण करण्यात आलंय मात्र प्रत्यक्षात त्या पोलीस स्थानकात कौन्सिलिंग करणारे व अन्य कर्मचारी नसल्याने गैरसोय होत आहे. या गोष्टीवर लक्ष देत पोलीस आयुक्तांनी ही बाब गंभीरपणे घेतली आहे.
गेली पाच वर्षे झाली तरी नवीन पोलीस आयुक्त इमारतीला मुहूर्त सापडत नाही त्याची उभारणी होण्यास दिरंगाई होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आपण लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. यासाठी 25 कोटी मंजूर झाला असून तो हस्तांतरण प्रक्रियेत आहे ते झाल्यास नवीन पोलीस आयुक्त इमारतीचे काम मार्गी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.