सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.
महादेवी नागरहळी यांचं शिक्षण बीए झाले आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार केला. आपल्या मुलांना सुशिक्षित बनवले. संसार चालवण्यासाठी निर्धाराने जीवन जगण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. 1992 भारत नगर शहापूर येथील अंगणवाडी येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
सरकारी अंगणवाडीतील गरीब कुटुंबातील छोट्या मुलांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देवू लागल्या. धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने त्यांनी कोवळ्या वयातील मुलांमध्ये अध्यात्माचीही बीजे रोवली.
गेली 26 वर्षे अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करताना त्यांनी शेकडो मुलांना भावी जीवनाचा पाया बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.