Saturday, January 25, 2025

/

वातावरण होत आहे गरम

 belgaum

लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरणेचे काम काल पासून सुरू झालेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा खासदार सुरेश अंगडी यांनी आपला अर्ज भरला आहे. आता वातावरण गरम होत असून निवडणुकीतील खरी रणधुमाळी आता सुरू होणार आहे.

बेळगाव लोकसभा निवडणूक मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रतिस्पर्धी आहेत. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीने अबकी बार मै भी खासदार ही मोहीम सुरू करून राष्ट्रीय पक्षांचा ताप वाढवला आहे. 101 उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतल्याने मराठी मतदारांपैकी किमान 50 टक्के मतांची विभागणी होऊ शकेल असा अंदाज आहे.
भाजपने आपला प्रचार सुरू केला आहे. खासदार अंगडी हे शक्तिप्रदर्शन करून आपला अर्ज आणखी एकदा भरणार आहेत तसेच काँग्रेसचे उमेदवार व्ही एस साधून्नावर हे देखील आपली शक्ती दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मतदारांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न सर्व उमेदवार करणार आहेत. आतापर्यंत उमेदवार निवड व इतर चर्चा होत्या पण यापुढे सर्व पक्षीय उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते काम जोरात करणार आहेत.
101 उमेदवारांनी अर्ज भरण्याची सुरुवात झाल्यावर वातावरण गरम होणार आहे. निवडणुकीत जास्त उमेदवार झाले तर निवडणूक आयोगाच्या डोकेदुखी वाढणार आहे. ईव्हीएम मशीन वर इतक्या उमेदवारांना मते घालणे शक्य होईल की नाही याचाही विचार निवडणूक आयोगासमोर आहे. सर्व अर्ज भरून झाल्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढे कोणता निर्णय घेतील त्याकडे सुद्धा मतदार आणि उमेदवारांचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणूक ही देशात भक्कम सरकार उभे करण्यासाठी महत्वाची असते. भ्रष्टचार मुक्त आणि देशाचे हित लक्षात घेऊन काम करणारे सरकार निवडून देताना प्रत्येक मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे असे आवाहन होत आहे.
निवडणूक आयोगाने सुद्धा प्रत्येक मतदार मतदान करेल यासाठी जागृती करीत आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.