निलजी येथे चोर समजून खांबाला बांधून ठेवण्यात आलेला व्यक्ती खांबाला बांधलेल्या स्थितीतच दगावला आहे.
सोमवारी रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला नागरिकांनी चोर समजले. त्यापैकी काहींनी खांबाला बांधून घातले होते. मात्र, त्याचा त्याच ठिकाणी रात्री मृत्यू झाला आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे निलजी गावात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत. रात्रीच त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे होते पण त्याला बांधून ठेवण्यात आल्याने आता नसत्या गोष्टीला काही जणांना सामना करावा लागणार आहे.