येळ्ळूर ग्रामपंचायतीने केला रिंग रोड विरोधात ठराव
बेळगाव शहराच्या भोवताली होत असलेला रिंग रोड हा शेतकर्यांच्या जमिनींवर हल्ला करणार आहे यामुळे याला आपला विरोध असल्याचा ठराव येळ्ळूर ग्रामपंचायतीने केला आहे.
यासंदर्भात हा ठराव सर्वानुमते संमत करून रिंग रोडचा कायम विरोध असेल असे मत मांडले आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य राजू पावले यांनी हा ठराव मांडला, रिंग रोड मुळे होणारे भूसंपादन शेतकऱ्यावर वाईट परिस्थिती निर्माण करणारे आहे, यामुळे रिंग रोड होण्यास आमचा विरोध आहे असे मत त्यांनी मांडले याला इतर सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले
त्यामुळे सर्वात प्रथम रिंग रोड विरोधात ठराव करणारे ग्रामपंचायत म्हणून आता येळ्ळूर ग्राम पंचायत ओळखली जाणार असून सरकारला या ठरावाची दखल घ्यावीच लागेल.
येळ्ळूर गावाने सारा बंदीचा लढा यशस्वी केलाय या गावाला इतिहास आहे आता रिंग रोड ला एक इंच जमीन देणार नाही पूर्ण येळ्ळूर गाव या जमीन संपादनाला कडाडून विरोध करणार आहे अशी प्रतिक्रिया राजू पावले यांनी दिली.