बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे विभाजन करून त्याची एक शाखा हासन येथे काढणार या कर्नाटक सरकारच्या घोषणेमुळे बेळगाव मध्ये मोठे वादळ उठले, विद्यापीठाचे विभाजन नको त्यामुळे निधी वाटला जाईल असा समज करून घेऊन आंदोलने झाली ,या आंदोलनाचे फलित म्हणून सरकारने विभाजन टाळले आणि व्हिटीयु पेक्षाही उच्च दर्जाची शैक्षणिक इन्स्टिट्यूट हासन येथे काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र यामागे विजय बेळगावातील स्थानिक आंदोलकांचा की मुख्यमंत्री कुमार स्वामींचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हासन मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी(हाय टेक) किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दर्जाची उच्च शैक्षणिक संस्था काढली जाणार अशी घोषणा सुरुवातीला केली असती तर उत्तर कर्नाटकावर अन्याय होतोय असा समज पसरला असता आणि इन्स्टिट्यूट उत्तर कर्नाटकात काढा अशी मागणी होऊन उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे कुमारस्वामी यांनी उलटा फासा टाकल्याची व आपल्याला काय पाहिजे ते साध्य करून घेतल्याची राजकीय तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते व्हिटीयु चे विभाजन हा कुमार स्वामींच्या राजकारणी डोक्यातील फक्त एक डाव असल्याचे बोलले जात आहे.व्हिटीयु चे विभाजन करणार असे म्हटल्यानंतर बेळगावातील लोक आंदोलनात उतरतील यावेळी विभाजन टाळल्याचे सांगून उत्तर कर्नाटकातील बेळगावच्या राजकारण्यांमध्ये सहानुभूती मिळवून घेता येईल आणि हे विभाजन टाळले यावर हासन वर म्हणजेच दक्षिण कर्नाटकवर अन्याय केला नाही तर त्या ठिकाणी त्यापेक्षाही उच्च दर्जाची शिक्षण संस्था स्थापन केली असे दाखवून राजकीय स्वार्थ साधता येईल असे गणित कुमारस्वामी यांनी खेळले आहे अशी चर्चा आहे.
याचबरोबरीने उत्तर कर्नाटक दुर्लक्षित आहे असा आरोप करून नेहमीप्रमाणे उत्तर कर्नाटकावर अन्याय हे पालुपद स्थानिक राजकारण्यांना म्हणता येणार नाही अशा प्रकारे कुमारस्वामी यांनी राजकारण खेळले असल्याची चर्चा असून राजकीय विश्लेषकांचे हेच ठाम मत आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे सुपुत्र असलेले कुमार स्वामी हे धुरंदर राजकारणी म्हणून ओळखले जातात कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी उलटा फासा टाकण्याचे त्यांचे धोरण राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जाणले जाते. विभाजन करण्याचा डाव खेळून त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलने होतील याचा विचार पूर्वीच केला होता त्यांनी आंदोलने करून हिरोगिरी करणाऱ्याना संधी मिळाली मात्र कुमारस्वामी यांच्याच् मनात काही वेगळेच होते आणि जे काही वेगळे होते ते त्यांनी साध्य केले अशी चर्चा आहे खरे काय ते कुमारस्वामीच जाणोत!