कै. रामचंद्र बाबुराव जाधव यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बेळगावच्या अतुल शिरोळेने मारले आहे जवळपास १० हजारावर प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान होते.
साऱ्या कुस्ती शौकीनांच्या नजरा बेळगाव च्या पै. अतुल शिरोळे आणि वारणेचा खेळाडू पै. गोरख जाधव यांच्याकडे लागुन राहिल्या होत्या ठीक पाच मिनिटे दोन्ही खेळाडूमधे चुरस चालली होती अखेर सहाव्या मिनिटाला पै.अतुल शिरोळे ने प्रतिस्पर्धी पै. गोरख जाधवला ढाक डावावर चारीमुंड्या चित करत आस्मान दाखवुन उमेश्वरी केसरी किताब चांदीची गदा आणि रोख रक्कम १० हजार असा पुरस्कार मिळविला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आतंरराष्ट्रीय कोच प्रल्हाद जाधव व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले.मुचंडी येथील पैलवान अतुल शिरोळे याने गेल्या दोन वर्षांपूर्वी कझाकस्तान येथे ज्युनियर कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.