लोकसभा निवडणूक जवळ आली आहे.त्यामुळ चौथ्या वेळी खासदार होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खासदार सुरेश अंगडी यांनी काहीही करून प्रसिद्धी मिळवायची आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा विडाच उचलल्याचे दिसते.
बेळगाव बंगलोर ही स्टार एअरची विमानसेवा सोमवारपासून सुरु झाली .ही विमानसेवा नियमित प्रकारची आहे.या सेवेचा उडाणशी दुरान्वयाने देखील संबंध नाही.असे असताना विमानसेवा सुरु होण्याच्या दिवशी उडाण योजने अंतर्गत ही विमानसेवा सुरु झाली आहे असे ट्विट करून न केलेल्या कामाचे श्रेय सोयीस्कररित्या घेण्याचा प्रयत्न केला.अंगडी यांची हि चलाखी सोशल मोडियावर आल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
दुसरी घटना आहे तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाची.उड्डाणपुलाच्या कामाचा मुहूर्त करून खासदार सुरेश अंगडी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चमकोगिरी करून एक महिना झाला पण उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही.पंधरा वर्षे खासदारकी भोगून अंगडी यांनी कोणतेही भरीव प्रकल्प राबवले नाहीत की लोकसभेत तोंड उघडले नाही.
त्यांनी पंधरा वर्षाच्या खासदारकीचा वापर कशासाठी केला हे साऱ्यांनाच माहित आहे.त्यामुळे चौथ्या वेळी खासदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सुरेश अंगडी याना मतदारांनी मत मागायला येतील त्यावेळी तुम्ही काय केला म्हणून सवाल करण्याची वेळ आली आहे.या सर्वांवर प्रतिक्रिया देण्यासाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.