छत्रपती शिवाजी महाराज उद्याना समोरील स्वच्छतागृह हटवा अशी मागणी युवा समितीने केली होती. या मागणीस यश आले असून सध्या जेसीबी लावून ते स्वच्छतागृह पाडवण्यात आले आहे.युवा समितीने महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधूश्री पुजारी, पालिका आयुक्त शशीधर कुरेर यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
युवा समितीच्या मागणीची दखल पालिकेने घेतली असून या आंदोलनास यश मिळाले आहे. युवकांच्या हातात नेतृत्व दिल्यास तेआंदोलने यशस्वी करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे समिती नेत्यांनी युवकांना नेतृत्व द्यावे या मागणीला देखील जोर आला आहे.
या स्वच्छता घरा बाबत युवा समितीने निवेदन देऊन आपल्या समस्त बेळगावकरांचे आणि मानबिंदू म्हणजे छ. शिवाजी महाराज उद्यान आहे, पण मागील काही वर्षांपासून उद्यान समोर एक स्वच्छतागृह(मुतारी) आहे, त्यामुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरत आहे तसेच जर ती अस्वच्छ असेल तेव्हा काही लोक मुतारीच्या बाहेर सुद्धा नैसर्गिक विधी साठी थांबतात पण सार्वजनिक ठिकाणचे भान ठेवले जात नाही आणि उद्यानाच्या ठिकाणी महिला आणि बालकांचा वावर सुद्धा जास्त असल्याने सर्वांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सदर मुतारी तेथून हटविणे तातडीचे आहे. तरी आम्ही आपल्याला विनंती करीत आहोत की संबंधित खात्याला ती मुतारी हटविण्याची सूचना करावी आणि इतर ठिकाणी ते स्वच्छतागृह निर्मिले जावे अशी मागणी केली होती.
आम्हा सर्व शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून आम्ही एकदा या विषयाचा मागोवा घेत विषयाचे गांभीर्य लक्षात यावे याकरिता पुन्हा एकदा निवेदन देत आहोत असा निर्वाणीचा इशाराही दिला होता.
येत्या 19 फेब्रुवारीला जी सरकारी पातळीवर शिवजयंती केली जाते त्याच्या आधी ते स्वच्छतागृह हटवून परिसर स्वच्छ करण्यात यावा, नाहीतर आम्ही त्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत, जर शिवप्रेमीच्या भावना उसळल्या तर सांभाळणे प्रशासनाला नक्कीच कठीण जाईल तेव्हा या आमच्या यासंबंधी शेवटच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार होऊन लवकर त्यावर अंमल असे म्हटले होते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच कारवाई केली आहे.निवेदन देतेवेळी अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील
सरचिटणीस श्रीकांत कदम,सत्ताधारी गटनेते, माजी उपमहापौर संजय शिंदे पदाधिकारी, चंद्रकांत पाटील, मनोहर हुंदरे, अंकुश केसरकर, बाबू पावशे, किरण हुद्दार, विजय जाधव, रोहन लंगरकांडे, विनायक कावळे, वासू सामजी, विकास लगाडे, शुभम भेकने, रोहन कंग्रालकार, सचिन केळवेकर आणि आदी शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.