बेळगाव शहराच्या तिसरा रेल्वे गेट वर रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्याचे उदघाटन झाले मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही .निविदा काढण्यात आलेली नाही तसेच कंत्राटदार निश्चित झाला असला तरी बांधकामाचे काम सुरू झालेले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. या रेल्वे ब्रिजचे काम कधी होणार असा प्रश्न नागरिकांना मध्ये उपस्थित झाला आहे .
रेल्वे प्रशासन सज्ज असले तरी राजकीय अडथळ्यांमुळे हे काम रखडले असल्याची चर्चा आहे. मोठा गाजावाजा करून लवकरात लवकर काम सुरू करणार असे सांगून उदघाटन झाले मात्र कामाचा पत्ता नाही अशी परिस्थिती आहे. दोन महिने उलटून गेले असले तरी काम सुरू होत नसल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतरच काम सुरू होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे .निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामात अडथळा येऊ नये म्हणून तसेच श्रेय घेण्यासाठी लवकर उद्घाटन करण्यात आले मात्र आता काम सुरू होत नसल्यामुळे लवकर उदघाटन करून उपयोग काय झाला असा प्रश्न निर्माण होत आहे.
याकडे स्थानिक खासदाराने लक्ष देण्याची गरज आहे .लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच सुरू होणार आहे या आचारसंहितेत जर काम अडकले तर सहा ते आठ महिन्यापेक्षा पुढे जाऊ शकते.
तिसरा रेल्वे ब्रिजचे काम सुरू झाल्यानंतर रहदारीचा प्रश्न पुन्हा गंभीर होणार असल्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच कामाला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती मात्र उदघाटन लवकर उरकण्यात आले आता काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.