नंदीहळ्ळी (ता बेळगाव) येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यानि लक्ष्मी मंदिरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून याची माहिती बेळगाव पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
चोरट्यानी देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने व इतर किमती ऐवज लांबविल्याची माहिती मिळाली आहे. मध्यरात्री 2 ते पहाटे 4 च्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी किती किमतीचा ऐवज लाबविला हे आता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबतची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. देवळात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
शहर आणि उपनगरात चोऱ्या घर फोड्याचे प्रकार वाढत असताना आता चोरट्यानी ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य बनविले आहे. मागील काही महिन्यापासून ग्रामीण भागातील मंदिरे लक्ष बनविण्यात येत आहेत. रविवारी नंदीहळ्ळी येथे ही घटना उघडकीस आल्याने पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.