खानापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने हजारोंच्या संख्येने बेळगावहून भाविक जात आहेत .यामुळे चार तासांहून अधिक काळ बेळगाव खानापूर रोडवर ट्रॅफिक जाम झाला असून मेगा ब्लॉकचा अनुभव नागरिकांनी घेतला .रहदारी खोळंब्यामुळे पोलिसांनाही योग्य ते नियोजन करण्यात आलेले नाही.
खानापूर महालक्ष्मी यात्रा सुरू आहे रविवारी सुट्टी त्यामुळे अनेक भाविक वाहने घेऊन जात होते त्यासर्वांना सर्वांना अडकून पडावे लागले .सकाळी अकरा वाजताच्या सुमारास देसुरपर्यंत 10 किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या होत्या. वास्तविक रित्या यात्रेनिमित्त गर्दी अपेक्षित होती मात्र पोलिस दलाने मोठ्या प्रमाणात रहदारी नियंत्रण करणे गरजेचे होते पण गर्दीपुढे पोलिसांचे काहीच चालले नाही. त्यामुळे खानापूर पासून नंदगडच्या दिशेने देखील अंदाजे सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
खानापुरात भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली असून अंदाजे दहा लाख लोक खानापुरात आहेत. आणि येणाऱ्या पाहुण्यांना वाट दाखवण्यासाठी लोकांची तारांबळ उडाली आणि अनेकजण खानापूरच्या वाटेतूनच परतले आहेत. घर आणि लक्ष्मीची वाट दाखवण्यासाठी थांबणाऱ्या पाहुण्यांना कंटाळून माघारी परतावे लागले .यातच उष्णता अजून वाढू लागल्याने वाढीव तापमानाचा फटकाही भाविकांना बसू लागला आहे.