देशातील 6 महत्वाच्या विमानतळांचे खाजगीकरण करण्याच्या विरोधात सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला सांबरा विमानतळवरील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवून आज उपोषण आणि धरणे आंदोलन छेडले.
अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, मंगळूर, गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम या सहा महत्वाच्या विमानतळाचे खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घालण्यात आला आहे.
याला विमानतळ प्राधिकरणने विरोध केला असून ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. या विरोधात आज देशातील सर्व विमानतळावर आंदोलन छेडण्यात आले.
सांबरा विमानतळ असोसिएशनचे सचिव चंदन राणे यांनी उपोषण करून निषेध नोंदवला. धरणे आंदोलनात सुभाष पाटील, बसवराज अंगडी, ब्रह्मनंद रेड्डी, पी एस हिरेमठ, शिवाजी भडांगे, रमेश शिंगे, सुरेश कोलकार, राजू कुंनट्टया,निम्मी कुमार, फिरोज बाबू, शरत कुमार, एम.व्ही. अंनेश, सी.वाय. कांबळे आदी सहभागी झाले होते.