उडान मध्ये मिळालेले रूट लवकरच कार्यान्वित करून बेळगाव अहमदाबाद ही विमानसेवा सुरू करू बेळगाव शहराला देशातील इतर मोठ्या शहरांना जोडणार आहोत.भविष्यात पायलट चालना देण्यासाठी पायलट ट्रेनिंग स्कुल(फ्लाईग स्कुल) सुरू करणार आहे आमच्या कंपनीत सध्या पहिला पायलट म्हणून ऋषिकेश पाटील या बेळगावच्या तरुणाची निवड केली आहे असे मत स्टार एअर चे अध्यक्ष संजय घोडावत यांनी मांडले.
कर्नाटकाचे महसूलमंत्री आर व्ही देशपांडे खासदार प्रभाकर कोरे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दीप प्रज्वलन तर स्टार एअर चेअरमन संजय घोडावत यांनी केक कापला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी,आमदार अनिल बेनके अभय पाटील,एअर पोर्ट संचालक राजेशकुमार मौर्य, स्टार एअर चे एम डी श्रेणीक घोडावत उपस्थित होते.
स्टार एअर कंपनीचा बेस बेळगावला करून सांबरा विमान तळावर विमान दुरुस्ती केंद्र(हँगर) सुरू करू असे असे आश्वासन स्टार एअर कंपनीचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी दिले.स्टार एअर च्या सोमवारी दुपारी बेळगाव बंगळुरू या नियमित विमानसेवेचा शुभारंभ केल्यावर ते बोलत होते.
बेळगावला स्टार एअर कंपनीचा मुख्य तळ करण्याचा असे सांगत सांबरा विमान तळावर विमान दुरुस्ती केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने जागा मंजूर केली आहे याला विमान खात्याने परवानगी दिली आहे स्टार सोबत इतर कंपन्यांची विमाने देखील बेळगावात दुरुस्ती केली जातील असेही ते म्हणाले.विमानात अत्याधुनिक सोयी देण्यात आल्या आहेत सुरक्षेला प्राधान्य देणार असून आरामदायी प्रवासासाठी अनुभवी टीम मुळे शक्य झालं आहे.गेल्या महिन्यात भारत स्टार एअर 110 फेऱ्या विना अडथळा पूर्ण केल्यात हे 100 टक्के यश असून हा एक जागतिक विक्रम आहे असे घोडावत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित दोन्ही खासदारांनी घोडावत यांच्याकडे बेळगावातील रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योग सुरू करा अशी मागणी केलीप्रकाश हुक्केरी यांनी स्टार एअर च्या बंगळुरु विमानसेवेला शुभेच्छा देत कंपनीने मुंबई सह लवकर इतर शहरांना बेळगावला जोडा आणि महाराष्ट्र प्रमाणे बेळगावात उद्योग शिक्षण संस्था सुरू करा अशी मागणी केली तर
प्रभाकर कोरे म्हणाले घोडावत ग्रुप कडे आर्थिक पाठबळ भक्कम आहे बेळगाव करांच्या वतीनं जमीन मनुष्यबळ पुरवू अशी मागणी त्यांनी केली.