भारतात नव्यानेच हवाई सेवेत दाखल झालेल्या स्टार एयर कंपनीने आपल्याला हव्या असलेल्या विमानांच्या खरेदीसाठी ब्राझील येथील एम्ब्रॅअर या कंपनीशी बोलणी सुरू केलेली आहेत.
स्टारकडे सध्या 50 सीटर एमआरजे 145 विमाने आहेत आणि ही विमाने 22 मार्गावर चालवण्यासाठी ची तयारी सुरू आहे. अशी माहिती कंपनीचे सिमरन सिंग तीवाना यांनी एका माध्यमाला दिली आहे .
सध्या ब्राझीलच्या कंपनीला किती विमानांची ऑर्डर दिली आहे याची माहिती मात्र मिळाली नाही. स्टार एअर संजय घोडावत यांच्या मालकीची असून मुंबई विमानतळाशी त्यांची बोलणी सुरू आहे.
मोठ्या विमानतळावर स्लॉट मिळवण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे जानेवारीमध्ये हुबळी बंगळूर आणि तिरुपती विमानसेवा सुरू केली असून 25 फेब्रुवारीपासून बेळगाव बंगळूर सुरू करणार आहे या पार्श्वभूमीवर वाढीव विमानसेवा मिळवण्यासाठी विमानांच्या खरेदीची तयारी कंपनीने सुरू केली आहे.