ज्या आईच्या पोटातून त्याने जन्म घेतला त्या मुलाने तिचाच म्हातारपणी निर्घृणपणे धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव तालुक्यातील सुळगा(हिंडलगा) गावात घडली आहे.
बुधवारी( दि 27) सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर सुळगा गाव हादरले आहे.तसेच बेळगाव तालुक्यातही खळबळ माजली आहे.
पद्मावती बाळू चौगुले (रा. लक्ष्मी गल्ली सुळगा) वय अंदाजे 55 असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी आईचे नाव असून आरोपी मुलगा विनोद बाबू चौगुले (वय 34 )यास घटने नंतर पोलिसांनी अटक केली आहे.
(फोटो:- स्वतःच्या आईचा खून केलेल्या दारूच्या नशेतील युवक)
घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विनोद हा खून करतेवेळी दारूच्या नशेत होता. त्याची पहिली पत्नी सोडून गेली आहे. दुसऱ्या पत्नी सोबत देखील आजच दुपारी भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने धारधार शस्त्राने डोक्यावर जोरदार वार करून आईचा खून केला आहे. घटनेच्या अगोदर तीचे पती बाळू देखील घरात होते मात्र हल्ला करतेवेळी ते घराबाहेर पळून आले होते. खून झाल्यावर बराच वेळ घाबरून कोणीही घरात जात नव्हते शेवटी गावातील काही युवकांनी आरोपीला ताब्यात घेतलं अन पोलिसांच्या हवाली केले आहे.
जन्मदात्या मातेचा हत्यारा झालेल्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा दारूसाठी आईकडे पैसे मागत होता ते न दिल्याने डोक्यात अंगावर सपासप वार तिला ठार केले यावेळी वडील बाळू सोडवायला गेले असता त्यांच्या वरही हल्ल्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते घरा बाहेर पळून आले.या घटनेचे नेमकं कारण अजून समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.काकती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.