Sunday, November 17, 2024

/

राजहंस गडावरील ‘माती चोरी गोरल’ यांनी बंद पडली

 belgaum

येळ्ळूर जवळील राजहंस गडावरील माती चोरण्याचे काम जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी पाठपुरावा करून बंद पाडायला लावले आहे. भूगर्भ खात्याचे अधिकारी प्रविणकुमार यांच्याशी गोरल यांनी संपर्क साधून हा माती उपसा कायदेशीर आहे काय अशी विचारणा केल्यानंतर याची कोणतीही परवानगी घेतलेली नसून काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि गेली ३०० ते ४०० वर्षे येळ्ळूर गावच्या कुशीत राजहंसगड जपून ठेवलेली माती चोरली जात आहे. अलारवाड ते खानापूर पर्यंत महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने रात्रीच्या वेळी हजारो टन माती खोदून ती चोरण्याचा कारभार सुरू केला आहे. शिवकालीन आणि नैसर्गिक असा गड संपवून टाकण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले असून जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी हा विषय गंभीरपणे हातात घेतला आहे. गडाला धोका होईल अशा पद्धतीने या गडाच्या पायथ्याशी असलेला डोंगर भाग जेसीबी लावून रात्री खणला जात असून तेथील माती चोरली जात होती. हा प्रकार अतिशय निंदनीय होता. या गडाच्या आजूबाजूला खोदाई करण्याचा कुठलाही अधिकार नसताना आणि परवानगी सुद्धा न घेता हा बेकायदेशीर कारभार सुरू झाला होता. रात्रीच्या वेळी आजूबाजूची गावे शांत झाल्यावर जेसीबी आणून हे कारभार केले जात असून याची छायाचित्रे बेळगाव live कडे मिळाल्यानंतर live ने लगेचच काम हातात घेतले.

Soil theft
महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला माती कमी पडत असून त्यांनी देसुर मार्गे ती चोरून नेण्याचे काम सुरू केले आहे.ही कंपनी किल्ल्याचं अस्तित्व नष्ट करत असून शिवप्रेमी नागरिकांनी जागे होण्याची गरज आहे. असे आवाहन बेळगाव live ने केले होते.
लगेचच येळ्ळूर येथील जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी याबद्दल आवाज उठवला आहे. या कंपनीकडे अशी माती उपसून घेऊन जाण्याची कोणतीच परवानगी नाही असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच तहसीलदार, प्रांताधिकारी व इतर अधिकाऱ्यांना हे कळवले होते. आज त्यांनी भूगर्भ खात्याशी संपर्क साधला असता सदर कंपनीच्या प्रतिनिधींना फोन करून काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले.
कोणत्याही पद्धतीने काम पूर्णपणे थांबले पाहिजे अशी मागणी रमेश गोरल यांनी केली असून काम न थांबल्यास व परत सुरू झाल्यास माती घेऊन जाणाऱ्या वाहनांना रोखून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे तसेच ही चोरी केल्या प्रकरणी योग्य तपास लावून कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.