स्मार्ट सिटी योजनेतून आज बेळगाव शहरांमध्ये एकूण 246.36 कोटीच्या कामांना सुरुवात झाली आहे .सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेळगाव शहर बस स्थानकाचे काम 32 .25 कोटीचा आराखडा बनवण्यात आला असून चोवीस महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
तुमकुर येथील अपूर्व कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आलेले आहे आणि पाच फ्लोअर बांधले जाणार असून याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून एकावेळी एकोणनव्वद कार व बहात्तर मोटर सायकली त्याच्यामध्ये थांबू शकणार आहेत.
अशी व्यवस्था असणार असून मध्यवर्ती बसस्थानक आणि शहर बसस्थानकामध्ये एक रस्ता असणार आहे. आरटीओ ऑफिस ते जिजामाता सरकल हा मार्केट पोलीस स्टेशन ते भाजी मार्केट सर्किट हाऊस रोड 24.3 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार असून त्याचा शुभारंभ झाला आहे. सीबीटी पासून हॉटेल सुरभी पर्यंत रस्ता जोडला जाणार आहे त्यासाठी 6.12 कोटीचा निधी ठेवण्यात आला असून यासाठी बारा महिन्यांचा कालावधी लागणार आहे शहरांमध्ये 35 बस थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 6.54 कोटी खर्च अपेक्षित आहे.
महनतेश नगर श्रीनगर आणि अंजनेय नगर या भागात अंडरग्राउंड केबलिंग केला जाणार असून त्यासाठी 22 कोटीचा खर्च अपेक्षित आहे बेळगाव रेल्वे स्थानक यांच्यासमोर सौभद्र इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायवेट बस पार्किंग चे कंत्राट देण्यात आले असून त्यासाठी 1.96 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
46.68 कोटींचा खर्च करून कलामंदिरचा विकास करण्यात येणार आहे बंगळूर येथील यांकि कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले असून 2021 पर्यंत ग्राउंड फ्लोअर दोन मजले असे स्वरूप असेल. येथे असणाऱ्या दुसऱ्या मजल्यावर मल्टिप्लेक्सची व्यवस्था करण्यात येईल. बेसमेंट मध्ये कार पार्किंग आणि ग्राउंड फ्लोअर ला दुकाने असणार आहेत. पहिल्या मजल्यावर दुकाने आणि दुसऱ्या मजल्यावर आणि मल्टिप्लेक्स व मिटिंग हॉल व लॉबी असेल.
स्मार्ट रोड योजनेमध्ये 34.03 कोटी रुपये खर्च करून चार रस्ते होणार आहे त्यामध्ये कपिलेश्वर कॉलनी रोड एस पी एम रोड महात्मा फुले रोड शुक्रवार पेठ रोड आणि इतर रस्त्यांचा समावेश आहे एकूण 5.35 किलोमीटरचे रस्ते फेब्रुवारी 2020 पर्यंत तयार केले जाणार आहेत .
याचबरोबरीने काँग्रेस रोडचा विकास होणार असून 5.5 किलोमीटर रस्ता 37.96 कोटी रुपये खर्च करून केला जाणार आहे. हेरिटेज पार्क साठी 18.61 कोटींचा खर्च होणार असून ऑक्टोबर 2019 पर्यंत काम पूर्ण होणार आहे.
Any news of goodshed road Near Sagar Transport road