पोवाड्या नंतर जय शिवराय अशी घोषणा दिली म्हणून विद्यार्थ्यांस शिक्षकाने मारहाण करणाऱ्या त्या शाळेस शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी बेळगाव मधील एका शाळेत छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केल्यानंतर विद्यार्थ्याने घोषणा दिल्याच्या रागातून शिक्षकांने मारहाण केली होती त्याचा जाब महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने विचारताच शाळेकडून जाहीर माफी मागण्यात आली होती.
सदर शाळेत छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबाराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा नाहीत हे निदर्शनात आल्या नंतर त्या प्रतिमा युवा समिती पुरवेल अशी ग्वाही देण्यात आली होती.त्या नुसार मंगळवारी 19 फेब्रुवारी शिवाजयंतीचे औचित्य साधून युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन सदर प्रतिमा भेट दिल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या स्वीकारून जर देशप्रेमी नागरिक घडवायचे असतील तर महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि आमच्या शाळेला यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले.यावेळी युवा समितीचे पदाधिकारी विनायक कावळे, किरण हुद्दार, विजय जाधव, शुभम भेकने, विकास लगाडे, रोहन कंग्राळकर आदी उपस्थित होते. बेळगावातील मराठा रेजिमेंट ही संस्था देशाच्या सीमेवर देश संरक्षण करणारे जवान तयार करते अशी संस्था छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानते त्यांचे विचार युद्ध नीती घेऊन पुढे जाते अश्या वेळी प्रत्येक शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर या काळात भरतेश शाळेत ही घटना घडली होती त्यावेळी युवा समितीने सदर शिक्षकास जाब देखील विचारला होता त्यावेळी खालील न्यूज कव्हर केली होती ती न्यूज वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करू शकता…
‘जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यास युवा समितीचा दणका’