शहरात एकीकडे शासकीय जमिनीचे अतिक्रमण होऊन लोकप्रतिनिधींना अनेक सरकारी जमिनी वाचवण्यात अपयश येत असताना बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर येथे मात्र जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि ग्रामस्थांनी मिळून एक एकर अतिक्रमित सरकारी जमीन सोडवून घेतली आहे.
झाड शहापूर येथील शिवारातील सर्व्हे नंबर पाच मधील एक एकर जमीन शासकीय जमा करून त्या जागेवर तलाव निर्मिती कामास सुरुवात केली आहे.एक एकर जमिनीत तलाव खुदाई आणि बंधारा निर्माण करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा पंचायत मधून 13 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा पंचायत आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी या कामाचे भूमिपूजन केले.
सदर एक एकर जागा सपाट असुन या ठिकाणी पाच फूट खोल खुदाई करून बंधारा घालण्यात येणार आहे त्यामुळे या भागातील शेती जमिनीला याचा फायदा होईल चार महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती गोरल यांनी दिली.
पाणी अडवा पाणी जिरवा योजनेचं महत्व ओळखत झाड शहापूर ग्रामस्थांनी अतिक्रमण हटवत तलाव बनवत गावासाठी एक नवीन आदर्श दिला आहे या कार्यात रमेश गोरल यांची देखील तितकीच महत्वाची साथ मिळाली आहे. देसुर ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी काळसेकर, ग्राम पंचायत सदस्य मल्लप्पा मर्वे,जयश्री नंदीहळळी, मनीषा पालकर,बाबू गोरल,मधू नंदिहळळी, मोंनाप्पा बिरजे आदी उपस्थित होते.