खानापूर कडून बेळगावच्या दिशेने वेगाने येणाऱ्या कार आणि बेळगाव कडून खानापूरला जाणाऱ्या दुचाकींची आमोरा समोर टक्कर झाल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार तर एक युवक जखमी झाला आहे.रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान भूतनाथ मंदिर गणेबैल जवळ हा अपघात घडला आहे.
अमर संभाजी कडलेकर वय 27 रा.मूळ रामनगर,सदाशिवनगर बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव असून मंजुनाथ देवेंद्र बाळेकुंद्री वय 27 रा. बैलहोंगल हा जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
खानापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री हा अपघात झाला आहे दोन्ही वाहनांची आमोरा समोर टक्कर झाल्याने हा अपघात घडला आहे. या प्रकरणी खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सध्या खानापूर महालक्ष्मी यात्रा सुरू असून या रोड वर वर्दळ वाढली आहे.अपघात होताच या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यानी जखमींना वेळेत इस्पितळात पोचवण्याची प्रयत्न केले मात्र 108 एम्ब्युलन्स उशिरा पोचली त्यामुळेच या अपघातात एकट्याला प्राण गमवावे लागले आरोप देखील अपघात स्थळावर लोक करताना दिसत होते.
खानापूर यात्रे निमित्त मंगळवारी देखील बेळगाव खानापूर रोड वर गर्दी होण्याची शक्यता आहे.रविवारी या रोड वर पाच तास हुन अधिक काळ ट्राफिक जाम झाला होता मेगा ब्लॉक झाला होता याचा फटका अनेकांना सहन करावा लागला होता.
खानापूर पोलिसांनी मंगळवारी खास रहदारी नियंत्रण साठी बंदोबस्त आखला आहे अनेक जण अतिरिक्त पोलीस तैनात केले जाणार आहेत यात्रेच्या पहिल्या दिवशी प्रमाणे बेळगावं कडून खानापूर कडे जाणाऱ्या चार चाकींना रुमेवाडी क्रॉस मधून डायव्हर्ट केले जाणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.