Tuesday, November 5, 2024

/

रिंग जमीन संपादन विरोधी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार

 belgaum

रिंग रोड साठी संपादित होणारी सुपीक जमीन  संपादन विरोधात 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महामोर्चा ला मुचंडी गावातून हजारोच्या संख्येने हजर राहण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे हजारो चया संख्येने  मोर्चात सहभागी होऊ लढा यशस्वी करू असा एकमताने ठराव करण्यात आला.मंगळवारी रात्री मुचंडी येथे शेतकऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी ॲड. सुधीर चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना न्यायालयीन लढाई बरोबरच आता रस्त्यावरची लढाई देखील गरजेचे आहे असे सांगून गुरूवारी होणऱ्या महामोर्चा त लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन केले.ॲड.शाम पाटील बोलताना  म्हणाले की आंबेवाडी,कोंडस्कोप, मच्छे गावातुन अतिक्रमण करण्याचा सरकारी प्रयत्न हाणून पाडला आहे, त्याच प्रमाणे हा देखील लढा यशस्वी करूया असे म्हणाले.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले कर्नाटक सरकारचा हा कुटिल डाव आहे रिंगरोड मार्फत शेतकऱ्याना देशोधडीला लावुन इथला मराठी टक्का कसा कमी होईल हे सरकारच्या डोक्यात शिजतय, मात्र याबाबत मराठी माणसांनी निवडुन दिलेले ना भाजपचे ना कॉग्रेसचे प्रतिनिधी बोलतयेत सगळे सरकारचे चेले आहेत, सरकारने कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्र एकिकरण समिती तसेच युवा समिती हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ठणकाऊन सांगितले.

प्राचार्य आनंद मेणसे यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात अनेक उदाहरणासहीत शेतकरी लढ्याची सविस्तर माहिती दिली, व महामोर्चात जोरदार शक्तीप्रदर्शन करून सरकारचा कुटील डाव हाणून पाडा असे आवाहन केले.याप्रसंगी सभेला गावातील शेतकरी तसेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता… अध्यक्षस्थानी मल्लापा पाटील, तसेच संभाजी कोळजीगौड, मारूती भातकांडे, बाळू ताशिलदार, मारूती चौगुले, सिद्राई भंगारे,शंकर कुंडेकर, अशोक मोदगेकर,उदय पाटील,संदीप जक्काणे, सुधीर शिरोळे, गजानन वरपे,निलेश कुंडेकर, सिध्दार्थ भातकांडे,रोहन कुंडेकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.