Tuesday, December 24, 2024

/

‘मराठा डे निमित्त बेळगावात सुखोईची प्रात्यक्षिके’

 belgaum

भारतीय सैन्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्याजोगी कामगिरी बजावणाऱ्या मराठा लाईट इंफंट्रि सेंटरला अडीचशे वर्षे होत आहेत या निमित्ताने या बेळगावात मराठा सेंटर मध्ये ४ व ५ फेब्रुवारी रोजी भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केले आहेत.

४ फेब्रुवारी १६७० रोजी छत्रपती शिवरायांनी कोंडाना किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याचा पाया बळकट केला होता. शौर्याचे दर्शन घडवले होते हे महत्व जाणून मराठा इंफंट्रीने स्थापना दिवस म्हणून ही तारीख निवडली आहे. तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावत किल्ले कोंडाना मिळवून दिला होता यांच्या शौर्य त्याग बलिदानाचे प्रतीक म्हणून मराठा दिवस आयोजित करण्यात आला आहे.

250 वर्षाचा इतिहास असलेल्या मराठा रेजिमेंटने आजवर अनेक युद्धात आपले शौर्य,साहस दर्शन घडविले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हे मराठा सेंटरचे घोषवाक्य आहे ही घोषणा उच्चाताच सर्व सैनिकांत वीरश्री संचारते इतकेच काय तर शिवाजी महाराजांचा ‘गनिमी कावा’ हे मराठा सेंटरचे महत्वाचे अस्त्र आहे किंबहुना शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीचा वापर मराठा रेजिमेंट करत आलेली आहे.

Mlirc

चार ते सहा फेब्रुवारी होणाऱ्या मराठा दिवसाच्या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल कर्नल ऑफ दि रेजिमेंट पी जे एस पन्नू उपस्थित राहणार आहेत.सुखोई सारख्या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके बेळगावात सादर होणार आहेत हे देखील या मराठा डे चे खास वैशिष्ट्य असणार आहे. सुखोईची प्रात्यक्षिक दरवर्षी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनी दिल्लीत परेड मैदानावर उपस्थिताना पहायला मिळते मात्र बेळगावात मराठा सेंटर मध्ये सुखोई ची प्रात्यक्षिक पहाण्याची संधी बेळगावकर जनतेला पहायला मिळणार आहे. या शिवाय मल्लखांब सह अनेक कवायदी देखील आयोजित करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.