कणबर्गी येथील तलाव पुर्णपणे बंद न करता शेतकऱ्यांना तलावाच्या दोन्ही बाजूने मार्ग करुन द्यावा अशी मागणी माजी महापौर शिवाजी सूंठकर यांनी केली आहे.
कणबर्गी येथील मुख्य तलावाच्या बाबतीत शिवाजी सुठंकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महानगरपालिका आयुक्ताची भेट घेउन सदर मागणी केली आहे.
कणबर्गी येथील मुख्य तलावाची विकासकामे सुरू असुन तलाव बंद करण्यात येत आहे. या विकासकामाला शेतकऱ्यांचा विरोध नाही पण हा तलाव कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या जवळपास 2000 जनावरांना पाणी पिण्यासाठी व शेती कामांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे सरकारने हा तलाव पुर्णपणे बंद न करता शेतकऱ्यांना तलावाच्या दोन्ही बाजूने मार्ग करुन द्यावा असही निवेदनात म्हटले आहे.