बेळगाव तालुक्याचं लक्ष लागून राहिलेली पी एल डी बँक अध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे तत्कालीन अध्यक्ष महादेव पाटील यांच्या निधना नंतर हे पद रिक्त झाल होत.
मागील आठ महिन्या पुर्वी याच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदावरून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकीहोळी बंधू वाद निर्माण झाला होता शेवटी काँग्रेस हाय कमांड ला यात हस्तक्षेप करून वाद मिटवावा लागला होता.आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या महंतेश निंगनगौडा पाटील यांना तर सतीश जारकीहोळी जारकीहोळी यांनी मराठा समाजाला अध्यक्ष पद देण्यासाठी रस्सीखेच करत होते.
काँग्रेस प्रभारी ईश्वर खंडरे यांना बेळगावला यावे लागले होते त्यांनी महादेव पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेसची अभद्र युती या निवडणुकीत दिसली होती.मोठा आर्थिक व्यवहार मागील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झाला होता असे आरोप देखील झाले होते.
उद्या होणाऱ्या अध्यक्ष पदाची निवडणुकित देखील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समर्थकात चुरस निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पक्षातली संभाव्य अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी निवडणूक बिन विरोध करण्याचे आदेश हाय कमांड ने दिले आहेत त्यामुळे ही निवडणूक बिन विरोध होण्याची शक्यता आहे.शंकर नावगेकर यांचं नाव आघाडीवर आहे.