बेळगाव ते अनमोड पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ए च्या विरोधात अभिनेते आणि पर्यावरणवादी सुरेश हेबळीकर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
दांडेली हत्ती संरक्षित भागातून १४ किमी टप्प्यात होणारे रुंदीकरण थांबवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
न्यायालयाने यावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास एक नोटीस बजावली असून अनधिकृत रस्ता रुंदीकरण थांबवण्याची सूचना केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती एल नारायण स्वामी आणि दिनेश कुमार यांच्या विभागीय खंडपीठाने वनमंत्रालय आणि वन विभागाकडूनही अवहाल मागवला आहे.
खानापूर ते लोंढा पर्यंत महामार्ग करण्यासाठी २२००० हुन अधिक वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांनी या भागातून रात्रीची रहदारीसुद्धा बंद करा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.