Friday, December 20, 2024

/

बेकीनकेरेतील पीडिओ आणि सदस्यांत हमरीतुमरी

 belgaum

बेकीनकेरी ग्राम पंचायतचा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय अशी अवस्था झाली आहे. गुरुवारी ग्राम पंचायत मध्ये पीडिओ आणि ग्राम पंचायत सदस्य यांच्यात चांगलीच जुंपली होती. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने कर्मचारी वर्गाने मद्यस्ति करून यावर पडदा टाकला.

बेकीनकेरे ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या अतिवाड गावचे ग्राम पंचायत सदस्य हे स्मशानभूमीच्या कामानिमित्त गेले होते. स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी कोणता तरी निधी अथवा उद्योग खात्री योजनेतून निधी मंजूर करावा, अशी मागणी केली.

 

याचबरोबर अतिवाड गावात दोन स्मशानभूमी आहेत त्यांचा सुशोभिकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली यावेळी पीडिओ यांनी त्यांना उद्धट उत्तर देऊन त्यांनी असे आम्हाला करता येत नाही. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही करून घ्या असा सल्ला दिला.

यावर सदस्य यांनी तुम्हाला जमत नाही असे लेखी द्या, असे सांगता पीडिओ यांचा पारा वर चढला या आणि वादावादी आणखीन वाढली. ग्राम पंचायत समोर असलेली मंडळीही जमा झाली. दरम्यान कर्मचाऱ्यांनी मध्यस्थि करून यावर पडदा टाकला. मात्र पीडिओ आणि सेक्रेटरी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.