मागील दोन ते तीन वर्षांपासून बेकायदा वाळूवर टाच आणण्यात आली होती. मात्र आता ही वाहतूक काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धरून केली जात आहे. त्यामुळे या बेकायदेशीर वाळू वाहतुकीला रात्रीचा मुहूर्त सापडल्याचे दिसून येत आहे. मात्र ते रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही काही अधिकाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
या मागेही माती मिश्रीत वाळू फिल्टर करून ती विकण्यात येत होती. त्यावेळीही काही अधिकाऱ्यांना धरून असे धंदे सुरू करण्यात आले होते. आता मागील काही महिन्यांपासून खुले आम वाळू वाहतूक करण्यात येत होती. मात्र आता याला रात्रीचा मुहूर्त सापडला आहे.
काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आपला हप्ता वाढवीण्याच्या लालसेपोटी गरीब कामगारांचा बळी देत असल्याचे दिसून येत आहे. जर बेकायदेशीर वाळू वाहतूक चोरट्या मार्गाने करायची असेल तर ती खुलेआम करावी त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्द होऊ शकेल.
मात्र काही अधिकारी आपला खिसा गरम करण्यासाठी अनेक बेरोजगारांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार संताप जनक ठरत आहे. त्यामुळे जर अधिकृत मान्यता देऊन वाळू वाहतूक केल्यास अनेकाच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र काही पोलीस अधिकारी आपल्याच नावाने चांगभलं म्हणत असल्याचे दिसून येत आहे.