Friday, December 20, 2024

/

खानापूर समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर’

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या संघटनेत यावेळी अनेक नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे.माजी आमदार दिगंम्बर पाटील यांची खानापूर तालुका समिती अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्ष पदी यशवन्त बिरजे यांची निवड झाली आहे.खानापूर समितीने बऱ्या पैकी युवकांना संधी दिली आहे.समिती पुनर रचनेत युवकांना प्राधान्य मिळावे अशी मागणी बेळगावात सातत्याने होत होती शेवटी युवकांची दखल खानापूर समितीने घेतली आहे.

पदाधिकारी खालील प्रमाणे निवडण्यात आले आहेत.

अध्यक्ष-,दिगंबर पाटील,कार्याध्यक्ष-यशवंत बिर्जे, पाच जणांना विभागीय उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे त्यापैकी गर्लगुंजी विभाग-पांडुरंग सावंत-जाबोटी विभाग-जयराम देसाई,नंदगड विभाग-विठ्ठल गुरव-लोंढा -दीपक देसाई-खानापूर शहर-विवेक गिरी,चिटणीस-आबासाहेब देसाई,महादेव घाडी,खजिनदार महेश प्रभू प्रवीण पाटील-संपर्क प्रमुख-लक्ष्मण कसरलेकर,विशाल पाटील या सहा प्रत्येक गावातून एक सदस्य निवडण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातून एकीसाठी होकार मिळत नसल्याने संघटना मजबूत करण्याचा दृष्टिकोणातून नवीन कार्यकारिणी जाहीर केली असल्याची माहिती अध्यक्ष दिगंम्बर पाटील यांनी दिलीय.एकूणच या कार्यकारिणीत युवकांना संधी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.