बेळगाव सह कर्नाटक महाराष्ट्र गोवा येथील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोहनगा दड्डी येथील भावेश्वरी देवीची यात्रा आज बुधवार 20 फेब्रुवारी आणि गुरुवार 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेला बुधवारी सकाळी पासूनच उत्साहात सुरुवात झाली आहे.
प्रति वर्षा प्रमाणे माघ पौर्णिमे नंतर या देवीचा वार्षिक यात्रोत्सव आयोजित केला जातो मुंबई पुणे सह महाराष्ट्र आणि बेळगावातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला जात असतात नवसाला पावणारी देवी म्हणून भावेश्वरी देवी प्रसिद्ध आहे.भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी पासूनच बेळगाव हुन भाविकांनी मोहनगा दडडी कडे जाण्यास सुरुवात केली आहे.या यात्रेत बेळगाव भागातून लाखो भाविक जात असतात त्यामुळं बेळगाव शहरातील मराठी गल्ल्या आज उद्या ओस पडलेल्या असतात.
यात्रा काळात बेळगावातून वायव्य कर्नाटक परिवहन मंडळा कडून विशेष बसची सोय करण्यात आली आहे त्यामुळे भाविक बस आणि स्वतःच्या खाजगी गाड्या घेऊन देखील रवाना होत आहेत.