बेळगावची कन्या ऐश्वर्या मेस्त्री हीने बेंगलोर येथे झालेल्या मिस मोडेल इंडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून मिस मोडेल इंडिया हा किताब मिळवला. त्याचबरोबरीने मिस ब्युटी विथ पर्पज, मिस फोटोजेनिक आणि मिस बेस्ट नॅशनल वेअर असे तीन किताब मिळवले. बेंगलोर येथे ही स्पर्धा झाली या स्पर्धेत देशभरातील अनेक मुली सहभागी झाल्या होत्या.
ऐश्वर्याही बीकॉम पहिल्या वर्षात असून बेळगाव येथील लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी आहे.