मिरज लोंढा वास्को अश्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांची संख्या वाढवून बेळगाव गोवा दरम्यान रोरो सेवा सुरू करा अशी मागणी सिटीझन कौन्सिलने दक्षिण पश्चिम रेल्वेचे महा प्रबंधक अजयकुमार सिंह यांच्याकडे केली आहे.बेळगाव रेल्वे स्थानकाचे पहाणी करण्यासाठी सिंह शनिवारी बेळगाव दौऱ्यावर होते. रेल्वे स्थानकावर सिटीझन कौन्सिलने त्यांची भेट घेऊन बेळगाव रेल्वे स्थानाकावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची देखील मागणी केली.
अनमोड मार्गे रस्त्याची वाहतूक बंद झाल्याचा फटका खानापूर विभागातील गावांना बसला आहे बेळगाव गोवा राज्याचे संबंध शैक्षणिक, व्यापार आणि वैद्यकीय अशासाठी दैनंदिन आहेत त्यामुळे या मार्गावर रेलवे गाड्या वाढवाव्याम्हणजे वास्को बेळगाव मिरज या मार्गावर पॅसेंजर रेल्वे ची व्यवस्था करून लवकरात लवकर जंगल भागातील नागरिकांची वाहतुकीची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या गोवा रस्त्याचे काम सुरू आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत असून अवजड वाहतूकीसाठी रोरो सेवा सुरू करा तसेच बेळगाव रेल्वे स्थानकावर सुविधा पुरवा अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव हे सीमेवरील हाय अलर्ट असलेलं शहर त्यातच रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लॅट फार्म वर पेयजल आणि स्वच्छतागृह निर्माण करा असे देखील निवेदनात म्हटले आहे.निवेदनाचा स्वीकार करत रेल्वे अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.सिटिझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, सेवंतीभाई शहा, अरुण कुलकर्णी उपस्थित होते