Thursday, January 2, 2025

/

नूर मोहम्मद साठे नाटक बेळगावात

 belgaum

नूर मोहम्मद साठे नाटकाचा प्रयोग रविवार दि 10 फेब्रुवारी रोजी बेळगांव मध्ये होणार आहे. येथील कॉमन टच प्रोडक्शन निर्मित आणि प्रस्तुत दोन अंकी नूर मोहम्मद साठे या मराठी नाटकाचा हा प्रथम प्रयोग रविवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिर ( रिझ थिएटर ) येथे होणार आहे.
आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ व सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांनी हे नाटक लिहिलं आहे.

Noor mohammd sathe
या नाटकाचे दिगदर्शन जितेंद्र रेडेकर , नेपत्य अमेय पाटणकर नृत्य स्वाती कुलकर्णी संगीत श्रीधर कुलकर्णी प्राजक्ता बेडेकर, गायिका राजश्री हेब्बाळकर वेशभूषा वर्षा बकरे तर रंगभूषा गीता घडी यांनी सांभाळले आहे.
या नाटकामध्ये प्रमुख भूमिका महेश हळदणकर, अंकिता कदम , तेजस जाधव आणि जितेंद्र रेडेकर यांच्या आहेत.
” नूर मोहम्मद साठे ” या नाटकाची कथा काहीशी वेगळी आहे … वरवर गूढतेचे वलय पांघरून संवेदशील मनावर आरूढ होणारी आहे. यासाठी आपली सीट बुक करण्यास लोकमान्य रंगमंदिर , लोकमान्य ग्रंथालय या ठिकाणी किंव्हा
जितेंद्र रेडेकर 9916973272 / 9741273272 यांच्याशी संपर्क करा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.