Saturday, December 21, 2024

/

शिवाजी महाराजच आमचे प्रेरणास्थान:लेफ्ट.जनरल

 belgaum

मराठा सैनिक सदैव सज्ज असून तो बहाद्दूर आहे.मराठा इन्फंट्रीचे जवान तन, मन,धन अर्पण करून देशसेवा करतो.बोल शिवाजी महाराज की जय म्हणत देश विदेशात मराठा इन्फंट्रीने आमचा ध्वज उंचावला आहे. मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झालेत.आजच्या संचलनात हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व फ्लाईट लेफ्टनंट पूनम यादव यांनी करून महिला शक्तीचे दर्शन घडवले आहे असे गौरवोदगार कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नू यांनी काढले.

Mlirc belgaum
मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्यनिमित्त रेजिमेंटल सेंटरमध्ये आयोजित मराठा दिन कार्यक्रमात पी.जे.एस.पन्नू बोलत होते.यावेळी मराठाच्या आणि हवाई दलाच्या सैनिकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली.निवृत्त लष्कर प्रमुख जे.जे.सिंग,छत्रपती शाहू महाराज,राज्यसभा सदस्य संभाजीराजे,कुरुंदवाड संस्थानचे राजे पटवर्धन ,मराठाचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड,माजी लेफ्टनंट जनरल बच्चीतर सिंह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
सैनिकांना खडतर परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.नंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते असेही पी.जे.एस.पन्नू माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Mlirc bgm
मराठा दिनाचे औचित्य साधून वीर माता आणि वीर नारी यांचा सत्कार अनुपमा पन्नू यांच्या हस्ते करण्यात आला.लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या सह गेल्या चार वर्षात सीमेवर रक्षण करणाऱ्या शहीद जवनांच्या पत्नी आईंचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित विविध रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी शौर्य स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्याना आदरांजली वाहिली.

सकाळी मेजर तळेकर ड्रिल मैदानावर जवानांनी शानदार पथसंचलन केलं पहिल्यांदाच मराठा सेंटर मध्ये एअर फोर्स,नेव्ही मुंबई इंजिनियर्स पथकाने पथसंचलन केलं त्यांचे बँड देखील सहभागी झाले होते.

Mlirc belgaum
मराठा रेजिमेंटचा इतिहास शौर्य गाथा समजावी यासाठी शौर्या गाथा भवन निर्माण करण्यात आले असून लेफ्टनंट जनरल पी जे एस पननु यांनी म्युजियमचे उदघाटन केले या म्युजियम (शौर्य गाथा)मध्ये मराठा रेजिमेंटची पूर्ण माहिती फोटो आदी ठेवण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.