खानापूरच्या लक्ष्मी यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.ही यात्रा दि.२७ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकानी देवीचे दर्शन घेतले.
मागील लक्ष्मी यात्रा 2007 साली भरली होती बारा वर्षाच्या बारा वर्षानंतर आता पुन्हा लक्ष्मी यात्रा भरली आहे . सकाळी 6 वाजून 49 मिनिटानी लक्ष्मीचा विवाह सोहळा संपन्न झाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला .लक्ष्मी मंदिर पासून लक्ष्मीची मिरवणूक निघाली .लक्ष्मीचे माहेरघर मनसापूर आणि त्यामुळे मनसापुराची ओटी घेण्यासाठी लक्ष्मीदेवी तिथेच जाते .
परत पुन्हा अर्बन बँकेपर्यंत येते अर्बन बँकेकडून सातेरी माऊलीच्या मंदिरा कडे जाऊन तिथून ती पुन्हा अर्बन बँकेकडे येते आणि वतनदारांच्या आणि इतर मानकरांच्या तिथे ओट्या घेतल्या जातात . तेथून ती रवळनाथ मंदिर कडे जाऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथे संगी वाले वाहक असतात त्यांची चहा-नाश्ता पाण्याची सोय केली जाते. एक तासभर विश्राम घेतला जातो त्यानंतर पुन्हा देवी मार्गस्थ होते त्यानंतर चौरासी मंदिर, समदेवी मंदिर असा तिचा प्रवास करून त्यानंतर ती रविवार पेठ येथे आपल्या लक्ष्मीच्या गदगे वरती विराजमान होते. हा कालावधी साधारण संध्याकाळी सहा ते साडेसात चा कालावधी इतक्या वेळ लागतो पोहोचण्यासाठी रस्त्यामधून वाट काढत तिचा जयघोष करत साडेसातच्या दरम्यान लक्ष्मीची विराजमान होते त्यानंतर तिच्या दर्शनाला सुरुवात करतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम असतो.
मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस लक्ष्मीची ओटी भरण्याची दिवस आहेत आणि मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी संपूर्ण खानापूर आणि परिसरातल्या दोन विभाग केले आहेत एक विभागाला मंगळवार दिलेला आहे आणि दुसऱ्या विभागाला शुक्रवार केलेला आहे मंगळवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी भावसार वगैरे कोणी करू नये आणि देवीला नैवेद्यचे ते दिवस असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना सूचना केलेल्या आहेत लोकांच्या सूचनेप्रमाणे केलेले आहेत आणि अशा पद्धतीने अतिशय आनंदाने समारंभ सुरू आहे . या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चिखलामधून आणि त्याचा काही भाग लाकडापासून अशा पद्धतीने ही मूर्ती घडवली जाते. अतिशय सुबक अशी ही मूर्ती मूर्तिकार चित्रकार यांच्या कलेतून ते बनवले गेले आहे.
सगळ्यांनी शांततेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने एक आदर्शवत यात्रा खानापूर शहरांमध्ये भरवली जाते असा संपूर्ण लोकांच्या पर्यंत संदेश पोहोचवून संपूर्ण जनतेने सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटी सचिव यशवन्त बिरजे यांनी केले आहे.पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखाहून अधिक भाविक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
हा यात्रेचा अतिशय सुंदर असा समारंभ बेळगाव लाईव्ह ने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केल्यामुळे बेळगाव लाईव्हचे आम्ही शतशः धन्यवाद मानतो. बेळगाव लाईव्ह संपूर्ण नऊ दिवसाचे हा यात्रेचा कार्यक्रम आहे तो वरचेवर प्रसारित करून सर्व भक्तगणांना खानापूर शहराकडे मार्गस्थ करावं जेणेकरून या लक्ष्मी चे दर्शन घेऊन सर्व भाविक संतुष्ट होतील.असेही ते म्हणाले