कित्तूर चन्नमा सर्कल येथील सरकारी पॉलिटेक्निक च्या सर्वात वरच्या मजल्यावरून एक विद्यार्थ्याने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न सकाळी केला होता. त्याची स्थिती गंभीर होती त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. प्रेमभंग झाल्याचे दुःख होऊन त्याने ही आत्महत्या केली आहे. असे खडेबाजार पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
शिवप्रसाद पवार वय 18 रा. गजबरवाडी, निपाणी असे त्याचे नाव आहे. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत तो चवथ्या सेमिस्टर मध्ये शिकत होता. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीमुळे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले आहे. त्याचे कॉलेजमधील एक मुलीशी प्रेम होते. पण ती कायम त्याला नकार देत होती. आजही जर तिने नकार दिला तर आजचा दिवस आपल्या जीवनातील अखेरचा दिवस असेल असे त्याने आपल्या मित्रांकडे बोलून दाखवले होते.
आज सकाळी 10 वाजता तो नेहमी प्रमाणे कॉलेजला आला. व्हॅलेंटाईन डे असल्याने त्याने त्या मुलीस प्रेम करतो असे सांगितले पण तिने नकार दिल्यामुळे त्याने लागलीच कॉलेज च्या वरच्या मजल्यावर जाऊन आपला जीव दिला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.त्याला इतर कुठला त्रास होत की व्हॅलेंटाईन डे चे कारण आहे…? या बाजूने पोलिसांनी तपास सुरू केला आणि दुर्दैवाने तेच कारण बाहेर आले.
प्रेमात अपयश आले म्हणून आपले बहुमोल जीवन त्याने संपविले असून याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे पण असा अविचारी निर्णय त्याने घ्यायला नको होता अशीही प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.