खानापूर महालक्ष्मी देवीला जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला .गेल्या ९ दिवसापासून विविध नाविन्यपूर्ण अशा गोष्टींमुळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या खानापूर लक्ष्मी देवी यात्रेची आज सांगता झालीलाखोंच्या उपस्थितीत देवीला निरोप देण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी ४ वाजता देवीच्या मूर्तीला गदगेवरून उचलून मंदिराच्या समोर आणण्यात आले तिथे केंचापुर गल्ली व निंगापुर गल्लीतील मानाच्या संगी धारकऱ्यानी देवीच्या पालखीला धार्मिक पद्घतीने खेळवण्यात आले .व विविध धार्मिक विधी तिथे करण्यात आले.
गदगेसमोरील मातंगी देवाच्या झोपडीला अग्नी देऊन देवीची संगि तिथूनच जवळ असलेल्या देवीच्या पारंपरिक शेत वाटेवरून लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवून येण्याचे जी जागा आहे त्या ठिकाणी रवाना झाली.
त्या ठिकाणी देवी पोहचल्यावर हकदार ,वतनदार व यात्रा कमिटीच्या वतीने गाराणे घालण्यात येतो. उत्साही मनाने ९ दिवस देवीचा उत्सव साजरा करून आज जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देवीला देण्यासाठी लाखो भक्त जमले होते .