खानापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सिध्दोजी नारायण गावडे यांचे रविवारी मध्यरात्री १:३०वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .सलग ३री वेळ ते यावेळी देखील खानापूर नगरपंचायतीवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते .
खानापूर शहर शिवसेनेचे ते माजी शहर प्रमुख होते एक चांगले कुस्तीपटू होते ,अत्यंत कष्टातून त्यांनी परिस्थितीवर मात करून खानापूर तालुक्यातील मोठे खत व बी बियाणे विक्रेते म्हणून नाव लौकीक मिळविलेला होता .
त्यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत .त्यांच्या पत्नी यासुद्धा विद्यमान नगरसेविका आहेत.सिद्धोजी गावडे यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयावर तसेच खानापूर शहरवासियावर दुःखाची शोककळा पसरली आहे .
याच महिन्यात खानापूरची महालक्ष्मी यात्रा होणार आहे त्या अगोदर गावडे यांच्या निधनाने खानापूर शहरावर शोककळा पसरली आहे.शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान खानापूर येथे अंतिम संस्कार होणार आहेत.