धार्मिक आणि संस्कारक्षम वातावरणासाठी सर्वत्र प्रयत्न होत असतात. बेळगावच्या कांगली गल्लीत असाच संस्कारक्षम उपक्रम सुरू आहे. गल्लीत स्पीकर बसवून पहाटे पासून भक्ती आणि भावगीते लावण्यात येत आहेत. यामुळे गल्लीत संस्कारक्षम पहाट उगवू लागली आहे.
दुसऱ्यांच्या धर्माला आणि धार्मिक उपक्रमांना विरोध करत बसण्यापेक्षा आपण शहाणे होऊन संस्कारी वातावरणात जगण्याचा निर्णय या गल्लीतील नागरिकांनी घेतला असून याचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.
हे स्पीकर सगळ्यांना ऐकायला येतात. त्यांचा आवाज कमी जास्त करता येतो आणि नको असल्यास बंदही करता येतो त्यामुळे गल्लीत मंगलमय वातावरण राहते. गल्लीतील युवकांच्या या उपक्रमा मुळे पोजिटिव्ह ऊर्जा मिळते आहे अश्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.सदानंद हावळ, राजू हुब्बलकर,बाळकृष्ण तोपिंनकट्टी,सुधाकर हट्टीकर, नारायण किडवाडकरआदीच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
गल्लीतून ये जा करणाऱ्यांचेही मन प्रसन्न होऊ लागले आहे. हा आदर्श उपक्रम असल्याचे सर्व नागरिक बोलत आहेत.गल्लीत वातावरण प्रसन्न रहावं यासाठी प्रत्येक घरा समोर कुंडात एक झाड ठेवण्यात आले.पेटत्या दिव्या कडे पाहिल्यास मन प्रसन्न राहते यासाठी सतत पेटत असणारा दिवा गल्लीत ठेवण्यात आला आहे.
गेल्या नवरात्री उत्सवात याच गल्लीतील युवकांनी देवी स्थापना महा प्रसाद देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते एकूणच कांगली गल्ली हळूहळू का होईना धार्मिक बनत चालली असून या गल्लीचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे बनले आहे.