कडोली ग्राम पंचायत हद्दीत मास्टर प्लॅन राबविण्यास विरोध करण्यात आला आणि तसा ठरावही करण्यात आला मात्र काही सदस्यांनी आता आपल्या मनमानी कारभाराचा कळस गाठला आहे. कोणालाही विश्वसात न घेता गटार बांधकामाचे काम सुरू केले आहे त्यामुळे रस्ता नसला तरी गटाराचे काम करण्यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गटारीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र केवळ गटारीसाठी अडीच लाख मंजूर झाले आहेत आणि हा सारा निधीं गटारीसाठी वापरण्यात येणार आहे का की ही गटार बांधण्यात काही साटेलोटे तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान गावातली नागरिक विरोध केल्यास त्यांच्या घरी जाऊन मिनत्या करण्यात येत आहेत नाही तर धमकी दिली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
या गटारीला काही सदस्यांनी विरोध केला मात्र पोलिसांनी त्या सदस्याला कामात अडथळा आणल्यास बरे होणार नाही, अशी धमकी दिल्याचेही माहिती मिळाली आहे. त्यामुळे आणखी काही जणांना तर वन मंत्र्यांची धमकी दाखवून आपला मनमानी कारभार करत असल्याचे समजते. त्यामुळे ज्यांनी या गटारीला विरोध केला त्यांचा घरासमोरील खोदाई थांबून पुढे कामे करण्यात येत आहे. या गैरप्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
गावात विरोध होत असला तरी या गटाराचे काम कशासाठी की केवळ गटार बांधून पैसे लाटण्याचा तर हा प्रकार नाही ना? हा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील पाणी कालव्यात जोडून गावातील समस्यां दूर करत असल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.