स्वीमर्स क्लब बेळगाव आणि अक्वेरियस स्विमिंग क्लब बेळगाव यांच्यातर्फे दरवर्षी अपंग मुलांना जलतरण पटू बनवण्यात येते. यापूर्वी असे 17 कॅम्प झाले असून यंदा अठराव्या कॅम्पचे आज उदघाटन करण्यात आले.
साऊथ कोकण शिक्षण संस्थेचे चेअरमन आर डी शानभाग, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष मुकुंद उडचनकर व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांचे प्रयत्न आणि त्यांना रोटरी व इतर संस्थांची साथ मिळाल्याने अनेक अपंगांचे जीवन फुलले आहे. यावर्षी सुद्धा याच पद्धतीने जलतरण प्रशिक्षण देऊन अपंगांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाणार आहे.