Thursday, January 9, 2025

/

‘अन…संतप्त शेतकऱ्यांने प्रांताधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकली पिकं’

 belgaum

बेळगाव तालुक्यात सध्या रिंग रोड जमिन संपादन विरोधात शेतकरी आणि शासकीय अधिकाऱ्यां विरोधात जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे.शनिवारी प्रांताधिकारी कार्यालयात देखील याचाच प्रत्यय आला. हलगा मच्छे बायपास रोडच्या जमीन संपादनास विरोधात करत एका शेतकऱ्यांने आपल्या शेतीतील चार नमुन्यांची पिके टेबलावर फेकत जमीन संपादनास जोरदार विरोध केला.

शनिवारी सकाळी ए सी ऑफिस मध्ये ही घटना घडली हलगा मच्छे येथील शेतकऱ्यांना प्रांत अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा नोटीस बजावत हरकती दाखल केलेल्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

बैठकीवेळी अधिकाऱ्यांनी पत्रक छापलं होत स्वतः आम्ही जमीन सहखुषीने 2011 सालात शासनास दिली आहे अस नमूद होत त्यावर सह्या घेणार होते यावर वडगांव शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘आम्ही आमची शेती दिलीच नसताना तर तुम्ही असे पत्रक छापताच कसे म्हणून जोरात विरोध केला त्यावर मच्छेतील एक शेतकऱ्यांने तर आपल्या शेतात पीकलेलं मसूर,वाटाणा,हरभरा,जोंधळा कांकडी आणली होती ती प्रांताधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवत आमच्या पट्ट्यात येवढी पीक येत असतात.आमच जीवन चालत तर उताऱ्यावर नापिक दाखवून बायपास करताच कस ? असा प्रश्न देखील केला आणि तसे जर करत असाल तर आम्हाला विष पाजा आणी मगच या….आंम्हाला तुमचा एक रुपयाही नुकसान भरपाई नको.*सरकार लागले फसवायला,मग जगायच कशाला* अस म्हणत अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली. या नंतर प्रांत कार्यालयात पोलीस देखील जमा झाले होते.

Farmer meetप्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणानाने प्रांत अधिकारी कार्यालयात फक्त हलगा-मच्छे बायपास मधील शेतकऱ्यांची बैठक न बोलावता देसूर,खानापुरच्या इतर भागातून मार्ग रुंदीकरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची किती जागा गेली त्याचा तपशील घेण्यासाठी बैठक बोलावली होती त्यामुळं सदर बैठक म्हणजे एक फार्स असल्याचा आरोप शेतकरी राजू मरवे यांनी केला आहे.शेती बचाव समितीतर्फे त्यांना हालगा-मच्छे बायपासला प्रखर विरोध आहे आणी तो कसा बेकायदेशीर आहे हे दाखवून देणाऱ्या कारणांचे लेखी निवेदन देत जर आमच्या जमीनीत याल तर आमच्या हातातील चारा कापायचा विळा एक ना एक दिवस तुमच्यावर चालवावी लागतील असा गर्भित इशाराही दिला.कारण पोटास देणारी शेतीच जर शासन संपादित करत असेल तर इथे राहून तडफडण्यापेक्षा तुरुंगात मेलेल बरं.असेही अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून शब्द फुटत होते.

हा गोंधळ पाहून प्रांताधिकारी व महामार्ग प्राधिकारण वाल्यांनी बैठकितून काढता पाय घेत आलाय तसे चहा घेऊन जा म्हणून आवाहन करण्यात आले.पण सर्व शेतकऱ्यांनी चहापानावर बहिष्कार घालत बाहेर पडत निदान यापूढेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करणे बंद करा अन्यथा एक दिवस तुमच्या आंगलट येईल असे म्हणून निघून गेले. शेवटी 65 शेतकऱ्यांनी जमीन संपादनास विरोध करत पुन्हा हरकत नोंदवली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.