Friday, December 20, 2024

/

आज मिळणार किल्ला निर्मात्यांना बक्षीस

 belgaum

बेळगाव live आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा समारंभ आज शुक्रवार दि 8 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे  होणार आहे.

या  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आजरा येथील शिवसेना नेते प्रा सुनील शिंत्रे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल,हॅथवे केबल नेटवर्कचे सीईओ संजय कडोलकर, ज्येष्ठ फोजदारी वकील मारुती कामान्नाचे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक अनंत लाड,सिटिझन कौन्सिल बेळगाव चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त प्रणव विलास अध्यापक आणि राष्ट्रीय शोर्य ‘किताब प्राप्त निखिल जितुरी यांचा सत्कार केला जाणार आहे.

काय आहे बेळगाव live?

बेळगाव या सीमाभागातील महत्वाच्या सांस्कृतिक शहरात 2017 या वर्षी आम्ही बेळगाव live हे बेळगावातील पहिले मराठी वेब पोर्टल सुरू केले आहे.

अवघ्या दोन वर्षात  हे पोर्टल सुप्रसिद्ध बनले. बेळगावातील जनताच नव्हे तर देश आणि विदेशात पसरलेले बेळगावकर तसेच बेळगाववर लक्ष असणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकानेच ” बेळगाव live” वर भरभरून प्रेम केले. अशी एकही बातमी नसते की आम्ही ब्रेक करत नाही त्यामुळं अल्पावधीतच बेळगाव live लोकप्रिय वेब चॅनल बनलं आहे.पोर्टलचे फेसबुक पेज 40 हजार फॉलोवर्स च्या उंबरठ्यावर आहे आणि प्रत्येक बातमीला 20 ते 25 हजार हिट्स हे अल्पकाळात मिळवलेले यशच म्हणता येईल.

खास दिवाळी निमित्त युवकांना मराठी संस्कृती जतन करण्यासाठी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या किल्ला स्पर्धेचं बक्षिस वितरण आम्ही आज सायंकाळी सहा वाजता करणार आहोत

बेळगाव आणि महाराष्ट्र या दोघात बातम्यांसाठी सेतू बनण्याचे काम बेळगाव live करत आलेलं आहे.

bgm-live

गेल्या  दोन वर्षात बेळगाव live योगदान

बेळगाव मधील पहिले सोशल मीडिया मधले मराठी न्यूज चॅनेल…
#कार्याची दखल घेत 2018 सालचा सार्वजनिक वाचनालयाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आला.
#गणेश उत्सव, शिव जयंती या सणाचे live कव्हरेज लाखों लोकापर्यंत पोचवण्यात यश
#काळा दिवस,सीमा बांधवा वरील कर्नाटकी अन्यायावर अनेकदा वाचा फोडत बेधडक कव्हरेज-
#नोव्हेंबर 2018 बेळगाव प्रश्नी मुंबई आझाद मैदान उपोषणात यशस्वी रित्या कव्हरेज आंदोलनास पाठिंबा-
# मराठी संस्कृती टिकवण्यासाठी अनेक योगदाने, सेल्फी विथ गणपती बाप्पा,  विधायक गणेश मंडळ स्पर्धा यशस्वीपणे आयोजन आणि उत्कृष्ट किल्ले बनवणे स्पर्धा घेतली..
#पहिल्या वर्धापन दिनी राज्यसभा सदस्य दैनिक सामना संपादक संजय राऊत यांची उपस्थिती, मॅक्स महाराष्ट्र संपादक रवींद्र आंबेकर यांची देखील उपस्थिती
#विधायक गणेश मंडळ सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा बक्षीस वितरणास मराठा सेंटरचे ब्रेगेडियर गोविंद कलवड यांची उपस्थिती आणि बेळगाव live  चे कौतुक
#गेल्या दोन वर्षात शहरातील live अपडेट्स,ताज्या घडामोडी सर्वात फास्ट देणारे लोकप्रिय न्यूज चॅनेल म्हणून लौकिक-सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगावचे नाव देश विदेशात पोचवण्याचे काम करत आले आहे.

यापुढील काळातही बेळगावातील मराठी माणसाचा आवाज बनून हे पोर्टल सतत काम करत राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.