बेळगाव लोकसभेचा काँग्रेस उमेदवार अजून ठरलेला नाही याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता केवळ एक बैठक झाली असून अजून दोन ते तीन बैठका व्हायच्या आहेत त्यामुळे जिंकणारा उमेदवार यावेळी काँग्रेस कडून दिला जाईल अशी माहिती वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.सोमवारी सुवर्ण सौध मध्ये आयोजित बैठकी नंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
काँग्रेस हाय कमांडने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिल्या नंतर आमदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे मत वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
नोटीस पाठवलेल्या आमदारांनी अजून उत्तर दिलेलं नाही हाय कमांड कडे त्यांचं उत्तर येणं अपेक्षित आहे त्यांच्या नाराजीचे कारण काय आहे हे समजून घेतल्या वरच कोणती कारवाई केली जाईल हे समजणार आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे भाऊ रमेश जारकीहोळी यांच्या सह अथणीचे आमदार महेश कुमठहळळी आदींना नोटीस बजावण्यात आली आहे.